Skip to main content

Posts

Showing posts from January, 2018

शंभूरायांचा रायगड

सह्याद्रीच्या भाळीचा साज म्हणजे रायगड...दुर्गदुर्गेश्वर रायगड ! रायरीच्या डोंगरावरील या किल्ल्याचा इतिहास थेट बाराव्या शतकापर्यंत पाठीमागे जातो. तेव्हापासून इंग्रजी राजवटीपर्यंत अनेक कर्तृत्ववान राज्यकर्त्यांनी रायगडावर आपली सत्ता गाजवली ; पण आपल्याला ‘रायगड’ हे नाव उच्चारले,म्हणजे आठवतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड..शिवरायांचा रायगड ! शिवरायांच्या मृत्यूनंतर रायगडावर छत्रपतीपद भुषविले शंभूरायांनी, मात्र दुर्दैव महाराष्ट्राचे, शंभुराजांच्या मृत्यूनंतर रायगडावरील दफ्तरखाना भस्मसात झाला आणि शिवशंभूछत्रपती व रायगड याविषयीची अत्यंत त्रोटक माहिती आपल्याकडे उपलब्ध राहिली. आज रायगडावर हिंडताना संभाजीराजांसंबंधी काही स्मरण होईल असं काहीही नाही, असं आदरणीय प्र.के. घाणेकर गुरुजी ‘छत्रपती संभाजी स्मारक-ग्रंथात’ खेदाने नमूद करतात (पृ. ३४९). तरीही आपल्याकडील उपलब्ध साधनांचा वेध घेण्याचा हा प्रयत्न..शंभूरायांचा रायगड !   १७ अॉगस्ट १६६६, औरंगजेबासारख्या कावेबाज कोल्ह्याच्या जाळ्यातून सह्याद्रीचा सिंह आपल्या पुत्रासह अगदी अलगद सुटून बाहेर आला. मिर्झाराजा जयसिंगाच्या स्वारीतून धडा घेत आणि...