छत्रपती संभाजी महाराज हा नेहमीच जिव्हाळ्याचा आणि विवाद्य विषय राहिला आहे.आजही या स्वराज्याच्या द्वितीय छत्रपतीभोवती असणारे हे वादाचे वलय अतिशय दुर्दैवीच म्हणावे लागेल. संभाजीराजांविषयी काही महिन्यांपुर्वीच साहित्यातले संभाजी : समज आणि गैरसमज ' हा लेख लिहिला होता.तो याच ब्लॉगवर वाचता येईल. आज संभाजीराजे व दिलेरखान प्रकरणाबाबत काही ठराविक मुद्दे- संभाजीराजांचा दैदिप्यमान पराक्रम,त्यांचं शौर्य आणि स्वराज्यासाठी दिलेलं अजोड बलिदान सर्वज्ञात आहे.बखरी आणि ललित वाङ्मयानी चिकटवलेल्या काजळीतून आज पुर्णपणे बाहेर येऊन ते आज झळाळत आहे.अशावेळी हा शिवपुत्र खरंच शत्रुला जाऊन मिळाला असेल का ,असा प्रश्न पडतो. याबद्दल समकालीन साधनं काय म्हणतात त्याचा हा शोध – १. शिवाजी महाराजांचे विश्वसनीय व कर्तबगार सरदार कान्होजी जेधे यांच् घराण्यातील जेधे शकावलीतील उल्लेख असा - पौश सुध १० संभाजी राजे पारखे होऊन परली गडावरून पळोन मोगलाईत दिलेरखानापासी गेले. (संदर्भ - ऐतिहासिक शकावल्या - संपादक अविनाश सोवनी, पृ. क्र. २६ ) फारसी साधनं आणि सर्व बखरी संभाजीराजे थोरल्या छत्रपतींवर रागावून दिलेर...
।। महाराष्ट्रधर्मसेवातत्परः पाध्ये कुलोत्पन्नः अपर्णासुतः सागरः निरन्तरः ।।