‘लोकशिक्षण’ मासिकात डिसेंबर १९३२ मध्ये रियासतकार ‘गो. स. सरदेसाई’ यांनी लिहिलेला हा लेख,’मराठी रियासत’ च्या नवीन आवृत्त्तीत पुनश्च दिला आहे.सुमारे ऐंशी-पंच्याऐंशी वर्षांपुर्वी रियासतकारांनी मांडलेले हे विचार पाहिले,तर हे सरस्वतीपुत्र खरंच आपल्या काळाच्या पुढे जाऊन विचार करत होते,हे पटल्याशिवाय रहात नाही. त्या लेखाचा हा काही भाग- राष्ट्रीय इतिहास : अर्थ व्यात्प्ती आणि भुमिका History is always growing and for this reason it always needs to be rewritten. History is a progressive science, not merely because new facts are constantly being discovered , not merely because the changes in the world give to old facts a new significance, but also because every truly penetrating and original mind sees in the old facts something which had not been seen before. (James Bryce, British historian) …. इतिहास स्थिर नाही व निश्चितही नाही,ही गोष्ट दुसऱ्या एका दृष्टीनेही पटणारी आहे.एकाच व्यक्तीसंबंधाने इतिहासाचा अभिप्राय कसा वारंवार बदलत जातो याची उदाहरणे व्यवहारात आपल्या दृष्टीने कितीतरी ...
।। महाराष्ट्रधर्मसेवातत्परः पाध्ये कुलोत्पन्नः अपर्णासुतः सागरः निरन्तरः ।।