इतिहासाच्या बखरी, पोवाडे, काव्ये अशी साधने पुर्णपणे त्याज्यंच मानली पाहिजेत, इतिहासात त्यांचे स्थान शून्यंच, असा एक आढ्यतेखोर परंतु अर्धवट अभ्यासावर आधारभुत मतप्रवाह दिसतो. सहज वाचताना, तीन वेगवेगळ्या कालखंडांत लिहिलेल्या साहित्यांत हे सारख्या स्वरुपाचे मिळालेले आधार पहा.. शुक्रनीती हा ग्रंथ महाभारतकाळात लिहिला असे मानले जाते. त्यातील चौथ्या अध्यायातील एक श्लोक असा, यो वै सुपुष्टसंभारस्तथा षड्गुणमंत्रवित । बह्वसंयुतो राजा योद्धुमिच्छेत् स एव हि ।। अन्यथा दुःखमाप्नोति स्वराज्याद्भ्रश्येति च ।। २१९ ।। इथे, ज्या राजाजवळ विपुल सामग्री आहे, जो षड्गुण संपन्न आहे व ज्याचेपाशीं शस्त्रात्रांचा भरपूर पुरवठा आहे, त्यानें युद्ध करण्याची इच्छा बाळगावी, असे म्हटले आहे. संधी (बलिष्ठ शत्रुशी स्नेह), विग्रह(युद्ध), यान (शत्रुवर स्वारी करुन नाश) , आसन(स्वरक्षण करुन शत्रुचा नाश), आश्रय (स्वबल अल्प असता, ज्याचे योगाने शक्ती प्राप्त होते असा), आणि द्वैधीभाव (आपले सैन्य अनेक ठिकाणी विभागून ठेवणे) हे ते षड्गुण होत. आता जो शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतंच लिहिला गेला अशा समकालीन 'शिवभारत...
।। महाराष्ट्रधर्मसेवातत्परः पाध्ये कुलोत्पन्नः अपर्णासुतः सागरः निरन्तरः ।।