गतकालीन इतिहासाचे अवलोकन करीत असताना, काळाच्या मर्यादा जाणणे फार आवश्यक असते. वास्तविक इतिहासातील कोणत्याही घटनेचे जसेच्या तसे संपूर्ण आकलन करून घेणे अशक्य आहे. आपण केवळ उपलब्ध संदर्भ-पुराव्यांच्या आधारे जास्तीत जास्त सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू शकतो. कर्मकांड, अंधश्रद्धा, पोथीनिष्ठ धार्मिक समजूती यांचे मध्ययुगात वर्चस्व होते, हे खरेच ! केंद्रीय राजसत्ता पेशव्यांच्या मुठीत आल्यावर राजकीय व्यवस्थेत ब्राह्मणांचे वर्चस्व वाढले. माधवराव पेशव्यांच्या मृत्यूपश्चात या व्यवस्थेत जी अनागोंदी माजली तिची वर्णने क्लेशदायकंच आहेत. समाज म्हटला, म्हणजे असे दोष प्रत्येक समाजात, प्रत्येक काळात आढळतील; पण कुठल्याही बाबतीत असे थेट काळे-पांढरे पट्टे ओढता येत नाहीत; हेच दाखवण्यासाठी हा प्रयत्न. मध्ययुगात वर्णभेद व त्या त्या वर्णांची कर्तव्ये याविषयीची समजुत दृढ होती. या कर्तव्यांचे पालन म्हणजेच धर्मपालन असे समजले जात असे. याबद्दल एक उदाहरण देतो. छत्रपती संभाजी महाराज आपल्या 'बुधभुषणम्'या ग्रंथात शिवछत्रपतींचा गौरव करताना म्हणतात - येन क्षोणितले कलावविकले बुद्धावतारं गते गोपलेखिलवर्णधर्...
।। महाराष्ट्रधर्मसेवातत्परः पाध्ये कुलोत्पन्नः अपर्णासुतः सागरः निरन्तरः ।।