“अग्नि आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयांतून सह्याद्रि जन्मास आला.अग्नीच्या धगधगीत उग्र वीर्याचा हा अविष्कारही तितकाच उग्र आहे. पौरूषाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्री…!” विराट सह्याद्रीचं श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी केलेलं हे तितकंच अचाट वर्णन ! सह्याद्रीचा भुगोल राकट आहे,सह्याद्रीचा इतिहास अफाट आहे. हजारएक वर्षांपर्यंत सह्याद्रीचा इतिहास तर अगदी सहज पाठी जातो. इथले ताशीव कडे, आखीव लेणी आणि भरीव किल्ले इतिहासवेड्यांना- दुर्गवेड्यांना सतत साद घालत असतात..उन्हाळी,हिवाळी,पावसाळी सहली आखत तिनही ऋतूंत भटकंतीसाठी भटक्यांच्या टोळ्या सदासर्वदा तयार असतात. अपुऱ्या सोयीसुविधा,अज्ञान,निष्काळजीपणा,समजुती-गैरसमजुती,अतिउत्साहातील वेडे धाडस अशा काही कारणांमुळे या भटक्यांना विविध अपघातांना,आरोग्यविषयक समस्यांनाही तोंड द्यावे लागते. अशा समस्या उद्भवल्याच,तर त्यावर प्रथमोपचार करण्यासाठी,त्या समस्यांमुळे होणाऱ्या पुढील परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी दुर्गभ्रमंतीवेळी भटक्यांनी आपल्यासोबत काय साहित्य प्रथमोपचारासाठी सोबत बाळगावं, अशा प्रसंगी कोणती काळजी घ्यावी,याबद्दल थोडक्यात माहिती ...
।। महाराष्ट्रधर्मसेवातत्परः पाध्ये कुलोत्पन्नः अपर्णासुतः सागरः निरन्तरः ।।