“अग्नि आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयांतून सह्याद्रि जन्मास आला.अग्नीच्या धगधगीत उग्र वीर्याचा हा अविष्कारही तितकाच उग्र आहे. पौरूषाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्री…!” विराट सह्याद्रीचं श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी केलेलं हे तितकंच अचाट वर्णन ! सह्याद्रीचा भुगोल राकट आहे,सह्याद्रीचा इतिहास अफाट आहे. हजारएक वर्षांपर्यंत सह्याद्रीचा इतिहास तर अगदी सहज पाठी जातो. इथले ताशीव कडे, आखीव लेणी आणि भरीव किल्ले इतिहासवेड्यांना- दुर्गवेड्यांना सतत साद घालत असतात..उन्हाळी,हिवाळी,पावसाळी सहली आखत तिनही ऋतूंत भटकंतीसाठी भटक्यांच्या टोळ्या सदासर्वदा तयार असतात. अपुऱ्या सोयीसुविधा,अज्ञान,निष्काळजीपणा,समजुती-गैरसमजुती,अतिउत्साहातील वेडे धाडस अशा काही कारणांमुळे या भटक्यांना विविध अपघातांना,आरोग्यविषयक समस्यांनाही तोंड द्यावे लागते.
अशा समस्या उद्भवल्याच,तर त्यावर प्रथमोपचार करण्यासाठी,त्या समस्यांमुळे होणाऱ्या पुढील परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी दुर्गभ्रमंतीवेळी भटक्यांनी आपल्यासोबत काय साहित्य प्रथमोपचारासाठी सोबत बाळगावं, अशा प्रसंगी कोणती काळजी घ्यावी,याबद्दल थोडक्यात माहिती देणारा हा छोटासा लेखप्रपंच !
भटक्यांना कायम सतावणारी एक समस्या म्हणजे ‘डिहायड्रेशन’ अर्थात शरीरातील पाणी कमी होणे. लक्षात घ्या, शरीरातील पाणी कमी होणे,म्हणजे शरिरातील नुसते पाण्याचेच प्रमाण घटते,असे नव्हे; तर शरिरातील क्षारांचेही प्रमाण बदलत असते. उष्ण हवामान, कमी पाणी पिणे, प्रमाणाबाहेर शारिरीक कष्ट, जुलाब यातील कोणत्याही कारणाने ‘डिहायड्रेशन’ होऊ शकते. सगळ्यात आधी सर्व दुर्गभ्रमणकारांनी स्वतःजवळ पाण्याचा मुबलक साठा ठेवणं शिकलं पाहिजे. बऱ्याच हौशी पर्यटकांना किल्ल्यांवर फेरीवाल्यांकडून ‘पॅकेज्ड ड्रिंकींग वॉटर’च्या बाटल्या विकत घेऊन, पाणी पिऊन, तिथेच बाटल्या फेकून घाण करण्याची सवय असते. अभ्यासकांनी, नियमित भ्रमंती करणाऱ्यांनी अशा सवयींना प्रोत्साहन देऊ नये. ‘डिहायड्रेशन’ झाल्यास, त्यावर मात करण्याचा सर्वात स्वस्त आणि मस्त उपाय म्हणजे ‘ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन’ अर्थात ओआरएस् ! कुठल्याही औषध विक्रेत्याकडे ओआरएसची पाकिटं उपलब्ध असतात, ती सोबत बाळगावीत; गरज पडल्यास एक लिटर उकळवून ,गाळून निर्जंतूक केलेल्या पाण्यात पुर्ण एक पाकिट ओआरएस् टाकावे. असे सोल्यूशन जेव्हाही, जशी गरज लागेल तसे पित राहावे. डिहायड्रेशनवर हा उत्तम उपाय आहे.
दुखापती हा भटकंतीचाच एक भाग म्हटला पाहिजे. खरचटण्यापासून ते क्वचित हातापयांत मोच येणे, हाड मोडणे इत्यांदींपर्यंतच्या अनेक दुखापतींना भटक्यांना सामोरे जावे लागते. त्यावरील प्रथमोपचारासाठी खालील साहित्य आपल्याकडे असणे गरजेचेच आहे.
१. कापूस – जखम स्वच्छ करण्यासाठी, जखमेतून रक्त वाहत असताना त्यावर कापूस ठेऊन काहीवेळ जखम दाबून धरावी, जखमेतून वाहणारे रक्त थांबते. जखमेवर अँटिसेप्टीक सोल्यूशन लावताना ते हाताने लावण्यापेक्षा, कापसावर घेऊन लावावे. असा कापूस स्वच्छ असावा, शक्यतो कापूस बाहेर उघडा टाकण्यापेक्षा तो मुळ पॅकींगमध्येच असू द्यावा,लागेल तसा बाहेर काढून वापरावा.
२. अँटिसेप्टीक सोल्यूशन – डेटॉल, सॅव्हलॉन अशी अँटिसेप्टीक्स आता दैनंदिन जीवनाचा भाग झाली आहेत. त्याविषयी मी अधिक बोलायला नको. जखम स्वच्छ, निर्जंतूक करण्यासाठी आधी जखम पाण्याने स्वच्छ धुवून ही सोल्यूशन्स वापरावीत.
३. मलम (क्रिम्स/ऑइन्टमेनट्स) – सध्या बाजारात शेकडो क्रिम्स उपलब्ध आहेत. प्रथमोपचारासाठी ‘बीटाडीन ऑइन्टमेंट/ सोफ्रामायसिन अशी पारंपारिक क्रिम्स पुरेशी आहेत. फक्त मलम लावल्यावर जखम तशीच उघडी ठेवली,तर त्यावर माती चिकटून जखम घाण होऊ शकते; त्यापेक्षा बँडेज लावून जखम पुर्ण बंद करावी.
४. बँडेजेस् (Bandages) – सामान्यतः तीन प्रकारची बँडेजेस् सोबत बाळगावीत –
• अधेसीव्ह बँडेज अर्थात चिकटपट्टी – छोट्या जखमा झाकण्यासाठी किंवा मोठ्या जखमा बांधून, बँडेज जागेवर नीट बसवण्यासाठी.
• रोल बँडेज अर्थात सुती कापडाची गुंडाळी – ही कुठल्याही औषधविक्रेत्याकडे सहज मिळते. मोठ्या जखमा बांधण्यासाठी, रक्त भळभळा वाहत असताना ‘प्रेशर बँडेजींग’ करण्यासाठी वापरता येता. (प्रेशर बँडेज लावणे म्हणजे केवळ करकचून आवळून बांधणे नव्हे, ड्रेसिंग/बँडेजींग करणे एक कला आहे, निदान दुखापतींच्या समस्यांना ज्यांना नेहमी तोंड द्यावे लागते, त्यांनी ती शिकून घ्यावी. )
• क्रेप बँडेज (Crepe bandage) – केशरी वा गुलाबी रंगाची ही बँडेजेस आपल्याला अनोळखी नाहीत. काही प्रमाणात तन्यता (इलास्टीसिटी) हा गुण त्यांच्यामध्ये असतो. हातपाय लचकणे, मुरगळणे ( Ligament Injuries) हाडांच्या छोट्याशा फ्रॅक्चरवरील उपाय म्हणून, वा मोठ्या फ्रॅक्चरमध्ये मोडलेल्या हाडाला आधार देऊन स्थैर्य देण्यासाठी क्रेप बँडेज वापरता येते. क्रेप बँडेज विविध सांध्यावर कसे बांधावे, हे प्रत्येकाने शिकून घेतले पाहिजे.
दुखापत झाल्यावर पुढील काळजी घ्यावी –
• खरचटल्यास, छोट्या जखमा झाल्यास जखम फक्त स्वच्छ करुन, पुन्हा बाहेरील घाण चिकटू नये म्हणून जखम झाकणे पुरेसे आहे.
• मोठ्या जखमा झाल्यावर जर भरपूर रक्त वाहत असेल,त्यांवर बँडेजची एक घडी ठेऊन जखम घट्ट बांधून घ्यावी. मात्र जखम बांधत असताना संबंधित अवयवाचा रक्तप्रवाहही सुरळीत राहिल याची काळजी घ्यावी. बर्फाने शेकल्यास रक्तस्त्राव कमी होतो.
• हातपाय मुरगळणे, लचकणे यासाठी सांधा स्थिर ठेऊन क्रेप बँडेज बांधणे, बर्फाने शेकणे इ. गोष्टी पुरेशा आहेत.
• ज्या़ंना सांध्यांचे आजार, पाठदुखी, कंबरदुखी इ. आजार आधीपासून आहेत, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेले विविध ‘बेल्ट्स’ ,‘कॅप्स’ आपल्या सोबतंच ठेवावेत आणि त्याचा वापर करावा.
• हाड तुटल्याचा (फ्रॅक्चर) संशय आल्यास, संबंधित अवयवाला व्यवस्थित आधार देऊन, तो अवयव त्याच्या नैसर्गिक अवस्थेत ठेवून बांधावा. हातपायाची हाडे मोडल्यास आधाराला एखादी काठी, छत्री, पेपरची जाडसर गुंडाळी अशी कोणतीही सरळ आकारची वस्तू सोबत आधाराला लावून संबंधित अवयव बांधता येतो. बर्फाने शेकत राहिल्यास रक्तस्त्राव थांबतो, अवयव काळानिळा पडत नाही, सुज कमी होते, पुढील परिणामांणी तीव्रता कमी होते.
अतिघट्ट बँडेज वापरल्यास संबंधित अवयवाचा रक्तपुरवठा खंडीत होऊ शकतो. बांधलेला हात/पाय अतिप्रमाणात सुजणे, काळानिळा पडणे, बांधलेला अवयव सुन्न पडणे वा त्याला मुंग्या येणे इ. लक्षणे दिसल्यास त्वरीत बँडेज सैल करावे, दुखापतग्रस्त हात/पाय खाली लोंबता न ठेवता वरच्या बाजूस राहिल अशा रितीने बांधावा अथवा आधार देऊन वर घ्यावा, बर्फाने शेकत राहावे आणि शक्य तितक्या लवकर डॉक्टरांची मदत घ्यावी.
याव्यतिरीक्त दुर्गभ्रमंती करताना बरेचदा विविध प्रकारचे किटक किंवा जनावरे चावल्याचे प्रकार सर्रास घडतात. मधमाशा वा गांधीलमाशांचे हल्ले, साप अथवा विंचू चालणे जिवावर बेतू शकते. अशी घटनांबाबत पुढील काळजी घ्यावी.
• सर्वप्रथम विनाकारण कुठल्याही कपारीत, बिळात हात-पाय टाकणे, जनावरांना डिवचणे, पुर्ण माहिती, प्रशिक्षण नसताना जनावरांना पकडायला जाणे इ. गोष्टी शक्यतो टाळाव्यात.
• एखादाच किटक, विंचू चावला असता तो भाग धुवून स्वच्छ करणे. नांगी शरीरात अडकलेली असल्यास, शक्य झाल्यास नखाने, ब्लेडने अथवा चिमट्याने काढून टाकणे शिकून घ्यावे. किटकाचे विष त्या नांगीतंच साठवलेले असते, नांगी काढून टाकल्यास विष कमी प्रमाणात शरीरात भिनते.
• थंड पाण्याने, बर्फाने डंखाची जागा शेकल्यास आराम मिळतो.
• चावलेल्या जागी सुज वाढत असेल, तर बाधित अवयव शरीरापासून किंचित वर धरावा.
• डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊन, ‘अँटिहिस्टमिनीक’ गटातील मलम, कॅलामाइन लोशन इ. डंख मारलेल्या जागेवर लावल्यास आराम पडतो.
• किटक चावल्यानंतर जुलाब होण्यास सुरुवात होणे, धाप लागणे, अंगाला सूज येऊ लागणे ही धोक्याची लक्षणे आहेत, लवकरात लवकर डॉक्टर गाठावेत; ज्यांना अशा प्रकारच्या समस्यांना पुर्वी तोंड द्यावे लागले असेल, त्यांनी आपल्यासोबत पुन्हा अशा घटना घडणारंच नाहीत, याची पुरेपुर काळजी घ्यावी.
• कुत्रा, मांजर, डुक्कर, साप वा इतर जंगली प्राण्यांनी चावा घेतला असता –
o अवयव घट्ट बांधणे, जखमेवर हळद/चुना/आयोडीन लावणे, ब्लेडने चिरा मारणे, जखमेतील रक्त तोंडाने शोषून घेणे असे पारंपारिक परंतू चुकीचे उपचार टाळावेत. अशा पद्धतींनी उपाय कमी आणि अपाय अधिक होतो.
o जखम फक्त साबण आणि पाण्याने धुवून रुग्णाला धीर देत लवकरात लवकर डॉक्टर गाठावेत.
o नाग, मण्यार, घोणस, फुरसं अशा मोजक्या विषारी जाती ओळखायला शिकल्यास उत्तमंच !
वरील लेखात प्रथमोपचार पेटीत बाळगावयाच्या अशा बऱ्याचशा गोष्टींची नावे येऊन गेली आहेत. याशिवाय पुढील औषधे आपल्यासोबत ठेवावीत.
१. पॅरासिटॅमॉल – पॅरासिटॅमॉल हे औषध माहित नाही, असा माणूस विरळाच. वेदनाशामक आणि तापावर उपाय म्हणून अशा दोन्ही गोष्टींवर हे औषध वापरता येते. पॅरासिटॅमॉल आपल्यासोबत कायम असू द्यावी.
२. आयब्युप्रोफेन/ डायक्लोफिनॅक – ही दोन्हीही वेदनाशामक औषधे आहेत. या औषधांचे पॅरासिटॅमॉलसोबत मिश्रण (कॉम्बिनेशन) असलेल्या गोळ्याही मिळतात.
३. उलटी प्रतिबंधक औषधे – प्रवासात ज्यांना उलटीचा त्रास होतो (मोशन सिकनेस), त्यांच्यासाठी डायमेनहायड्रीनेट, मेक्लिझीन, स्कोपोलामिन अशी औषधे उपलब्ध आहेत.
ही औषधे व याव्यतिरीक्त कोणालाही काही आजार असल्यास त्यावरील औषधे, आपल्या डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घेऊन मगंच आपल्या प्रकृतीनुसार औषधे घ्यावीत. डॉक्टरी सल्ल्याशिवय कुठलेही औषध घेऊ नये.
नियमित भटकंतीसाठी बाहेर पडणाऱ्यांनी पुढील गोष्टी कराव्यात –
• काटे बोचणे, जनावरे चावणे, अंगावर जखमा होणे, यातून धनुर्वातासारखा आजार होऊ शकतो, तेव्हा डॉक्टरांना भेटून ‘टिटॅनस टॉक्सॉइड’चे इंजेक्शन घ्यावे.
• रात्री बाहेर उघड्यावर झोपत असाल, तर डास-किटक चावणार नाहीत याची काळजी घ्या. डॉक्टरांना भेटून मलेरीयावरील प्रतिबंधात्मक गोळ्यांचा एक कोर्स पुर्ण करा.
• पडक्या विहिरी, नियमित स्वच्छ न होणारे तलाव अशा ठिकाणी पोहणे, आंघोळ करणे, हातपाय धुणे यामुळे लेप्टोस्पायरॉसिस सारखे आजार होऊ शकतात. तेव्हा असे करणे शक्यतो टाळावे.
• ज्या भागात अशा आजारांचा प्रादुर्भाव आहे, अशा ठिकाणी जाण्यापुर्वी व जाऊन आल्यावर डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घ्या.
• पाणी शुद्ध व निर्जंतूक केल्याची खात्री असल्याशिवाय शक्यतो पिऊ नका.
सह्यगिरीच्या दोस्तांनो, स्वतःची आरोग्याची सर्वप्रथम काळजी घ्या. आपली भटकंती कायम निरोगी राहो !
- डॉ. सागर पाध्ये.
(लेखनाचे हक्क लेखकाकडे राखीव असून,लेखकाच्या नावाशिवाय लेख अन्यत्र प्रसारीत केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.)
https://www.facebook.com/Maharashtradharma1may/

http://sagarpadhye.blogspot.in/?m=1
Comments
Post a Comment