Skip to main content

Posts

Showing posts from 2018

छद्मपुरोगामी आणि मनुवाद (जाती-व्यवस्था कोणी निर्माण केली ?)

काय आहे, कोणाकोणाची फॅशन असते, प्रत्येक गोष्टीचं खापर भुतकाळावर फोडायचं. अमुक झालं नसतं, तर तमुक केलं असतं असे सुस्कारे सोडायला आवडतं काहींना ! कोणाकोणाच्या पोटापाण्याचा धंदा असतो हा. एका जातीविरुद्ध दुसऱ्या जातीला भडकवायचं आणि मग भावनेचं राजकारण करुन दुसऱ्या जातीची सहानुभूती मिळवायची. जन्मजात स्वत:ला उच्च मानून इतरांना 'नीच' म्हणत त्यांच्यावर अन्याय करण्याचं समर्थन कधीही मी करणार नाही; पण प्रश्न असा, मागासवर्गीयांचा विकास करायचा तर तथाकथित उच्चवर्णीयांना, देशाच्या प्राचीन धर्म-परंपरा आणि संस्कृतीला शिव्या दिल्याच पाहिजेत का ? जरा काही झालं का मनुवाद-मनुवादी म्हणत गळे काढण्याची गरज असते का ? जातीवाद मनुने किंवा ब्राह्मणांनी खरंच निर्माण केला का ? संपुर्ण जातीव्यवस्थेला केवळ एक ग्रंथ आणि एकाच जातीची साडेतीन टक्के लोकसंख्या जबाबदार असू शकते का ? जातीयवादास 'मनुवाद' संबोधत असाल, तर फक्त एकाच धर्माला, एकाच संस्कृतीला, एकाच जातीला शिव्या देणं आणि दुसरीकडे सोयीस्कर डोळेझाक करणं, हा नवा 'पुरोगामी मनुवाद' नव्हे काय ? कोणी काहीही म्हणायचं आणि आम्ही 'होय हो.....

विजयोन्मुख राजाची लक्षणे : शुक्रनितीसार, शिवभारत आणि चिटणीस बखर

इतिहासाच्या बखरी, पोवाडे, काव्ये अशी साधने पुर्णपणे त्याज्यंच मानली पाहिजेत, इतिहासात त्यांचे स्थान शून्यंच, असा एक आढ्यतेखोर परंतु अर्धवट अभ्यासावर आधारभुत मतप्रवाह दिसतो. सहज वाचताना, तीन वेगवेगळ्या कालखंडांत लिहिलेल्या साहित्यांत हे सारख्या स्वरुपाचे मिळालेले आधार पहा.. शुक्रनीती हा ग्रंथ महाभारतकाळात लिहिला असे मानले जाते. त्यातील चौथ्या अध्यायातील एक श्लोक असा, यो वै सुपुष्टसंभारस्तथा षड्गुणमंत्रवित । बह्वसंयुतो राजा योद्धुमिच्छेत् स एव हि ।। अन्यथा दुःखमाप्नोति स्वराज्याद्भ्रश्येति च ।। २१९ ।। इथे, ज्या राजाजवळ विपुल सामग्री आहे, जो षड्गुण संपन्न आहे व ज्याचेपाशीं शस्त्रात्रांचा भरपूर पुरवठा आहे, त्यानें युद्ध करण्याची इच्छा बाळगावी, असे म्हटले आहे. संधी (बलिष्ठ शत्रुशी स्नेह), विग्रह(युद्ध), यान (शत्रुवर स्वारी करुन नाश) , आसन(स्वरक्षण करुन शत्रुचा नाश), आश्रय (स्वबल अल्प असता, ज्याचे योगाने शक्ती प्राप्त होते असा), आणि द्वैधीभाव (आपले सैन्य अनेक ठिकाणी विभागून ठेवणे) हे ते षड्गुण होत. आता जो शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतंच लिहिला गेला अशा समकालीन 'शिवभारत...

शंभूरायांचा रायगड

सह्याद्रीच्या भाळीचा साज म्हणजे रायगड...दुर्गदुर्गेश्वर रायगड ! रायरीच्या डोंगरावरील या किल्ल्याचा इतिहास थेट बाराव्या शतकापर्यंत पाठीमागे जातो. तेव्हापासून इंग्रजी राजवटीपर्यंत अनेक कर्तृत्ववान राज्यकर्त्यांनी रायगडावर आपली सत्ता गाजवली ; पण आपल्याला ‘रायगड’ हे नाव उच्चारले,म्हणजे आठवतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड..शिवरायांचा रायगड ! शिवरायांच्या मृत्यूनंतर रायगडावर छत्रपतीपद भुषविले शंभूरायांनी, मात्र दुर्दैव महाराष्ट्राचे, शंभुराजांच्या मृत्यूनंतर रायगडावरील दफ्तरखाना भस्मसात झाला आणि शिवशंभूछत्रपती व रायगड याविषयीची अत्यंत त्रोटक माहिती आपल्याकडे उपलब्ध राहिली. आज रायगडावर हिंडताना संभाजीराजांसंबंधी काही स्मरण होईल असं काहीही नाही, असं आदरणीय प्र.के. घाणेकर गुरुजी ‘छत्रपती संभाजी स्मारक-ग्रंथात’ खेदाने नमूद करतात (पृ. ३४९). तरीही आपल्याकडील उपलब्ध साधनांचा वेध घेण्याचा हा प्रयत्न..शंभूरायांचा रायगड !   १७ अॉगस्ट १६६६, औरंगजेबासारख्या कावेबाज कोल्ह्याच्या जाळ्यातून सह्याद्रीचा सिंह आपल्या पुत्रासह अगदी अलगद सुटून बाहेर आला. मिर्झाराजा जयसिंगाच्या स्वारीतून धडा घेत आणि...