ही गोष्ट आहे शिवकाळातील कोंढवे गावच्या एका तरुणाची, त्याचं नाव 'येसाजी पाटील कामथे'. त्याचे पुर्वज एका मुसलमानाच्या वतीने गावच्या मोकदमीचा कारभार पहात असत. पुर्वी हिशेबात काही गडबड झाल्याच्या कारणाने येसाजीच्या मोठ्या भावाला सिंहगडावर नेऊन त्याचे डोके मारले होते. मात्र एक दिवस अवचित येसाजीला शिवछत्रपतींसाठी एक काम करायची संधी मिळाली आणि त्या संधीचे येसाजीने सोने केले... शिवचरित्र साहित्य खंड दोन, लेखांक १०५ मधील एका पत्रात ही गोष्ट आली आहे. पुर्वी दौलतशाह नावाच्या कोणा मुसलमान व्यक्तीकडे असलेले इनाम, त्याला मुलगा नसल्याने त्याची मुलगी रतनमा हिच्याकडे आले होते. त्याचा कारभार मात्र बाळोजी, हरजी व जाव पाटील पाहत असत. पुढे दादाजी कोंडदेवाच्या काळात सिंहगडावर नेऊन कुलकर्णीपण पाहणारा बावाजी पाटील व इतर कारभाऱ्यांची डोकी मारली गेली. त्या बावाजी पाटलाचा धाकटा भाऊ येसाजी पाटील ! एक दिवस शिवछत्रपती शिवापुरास आले आणि महाराजांनी शिवापुरात बाग आमराइसाठी धरण बांधण्याचा हुकुम सोडला. राजाचं काम म्हणून लोक लगबगीने कामास लागले; पण या कामात एक निराळाच अडथळा निर्माण झाला. वाटेतंच एक भला मोठा...
।। महाराष्ट्रधर्मसेवातत्परः पाध्ये कुलोत्पन्नः अपर्णासुतः सागरः निरन्तरः ।।