Skip to main content

संस्कार... संस्कृती... महाराष्ट्रधर्म


इतिहासाचा अभ्यास का करायचा ? या नेहमीच्या प्रश्नाला माझं एकंच उत्तर कायम असतं, 'राष्ट्रपुरुषांकडून 'राष्ट्रीय चारित्र्य' शिकण्यासाठी !' आपल्या पुर्वजांचे कर्तृत्व, संस्कार यांची जाण असली, म्हणजे नकळत आपलीही पाऊले त्या मार्गावर पडत राहतात.

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ मधील छत्रपती शिवाजी महाराजांचे एक पत्र प्रसिद्ध आहे.आपल्या छावणीच्या अधिकाऱ्यांस लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणतात, "सिपाही हो अगर पावखलक हो, बहुत यादी धरून वर्तणूक करणे. कोण्ही रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाही." (ले. २८)

आता थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीतील असेच एक पत्र पहा; सदर पत्र पेशवे दप्तर खंड १५, लेखांक ४६ असे प्रसिद्ध झाले आहे. अंताजी माणकेश्वर या पेशव्यांच्या सरदाराने चिमाजी आप्पांना लिहिलेले हे पत्र आहे. या पत्रात एका ठिकाणी अंताजी म्हणतात, "वरचेवर श्रीमंतांची पत्रे येविसी येतात की काडीचा उपद्रव रयेतीस न देणे."

कोणत्याही प्रकारे रयतेस तोशीस पोहचू नये, याची काळजी मराठ्यांचे राज्यकर्ते घेत होते. हाच शिवछत्रपतींनी शिकवलेला 'महाराष्ट्रधर्म' होता !

©डॉ. सागर पाध्ये.

Comments

Popular posts from this blog

शिवचरित्र कोणते वाचावे ?

"शिवचरित्र कोणते वाचावे ?", हा माझ्या व्हॉटसअॅप किंवा मेसेंजरवर हा सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे. माझ्याप्रमाणेच माझ्या इतिहासप्रेमी मित्रांनाही हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या प्रश्नाचे एकदा सविस्तर उत्तर द्यावे, म्हणून हा लेख लिहित आहे; येथे शिवचरित्राशी निगडीत संदर्भग्रंथाच्या यादीसोबत काही ठराविक चरित्रांविषयी थोडक्यात माहितीही देत आहे; पण लेख वाचण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात घेणे फार आवश्यक आहे. १. शिवचरित्र हा अथांग महासागर आहे. त्यात अगणित शंख-शिंपले आहेत; मोती आहेत. ज्याला ते जसे गवसले, तसे ते त्याने दाखवले. कोणी स्वार्थापोटी त्याचा हवा तसा बाजार मांडला. एकाला दुसऱ्याची मते पटतीलंच असे नाही. पटले, तर चांगले आहे; नाही पटले, तर खुशाल पुढे जा ! २. इतिहासाशी निगडीत कोणतेही साहित्य वा संदर्भग्रंथ पहा. त्या कृतीच्या कर्त्याने आपल्या विधानास विश्वसनीय पुरावा दिला असेल, तरंच ते सत्य. अन्यथा त्याकडे संशयानेच पहावे लागेल. ३. कोणतेतरी एकंच पुस्तक वाचले आणि शिवचरित्र कळले असे मुळीच होत नाही. त्यामुळे 'सर्वोत्तम शिवचरित्र कोणते ?', असा प्रश्न विचा...

साहित्यातले संभाजी : समज आणि गैरसमज

छत्रपती संभाजी महाराज,हा तमाम मराठी बांधवांच्या मनाचा एक हळवा कोपरा आहे.स्वराज्याच्या दुसऱ्या  छत्रपतीचं चरित्र तेजस्वी तरीही दुर्दैवीच म्हणावं लागेल. शंभूराजांच्या चरित्रात नाट्यमय घटना आहेत,हेवेदावे आहेत,बेफिकीर शौर्याचे लखलखते कल्लोळ आहेत,सुखाच्या श्रावणसरी आहेत आणि दुःखाचे काळेकुट्ट मळभही आहे.अशा चरित्राने नाटककार,कादंबरीकारांना भुरळ घातली नसती,तर नवलंच ! इतकेच कशाला मी स्वतः इतिहासाकडे वळलो,तो लहान वयातच शिवाजी सावंताचे 'छावा' वाचून जे प्रश्न पडले,त्याची उत्तरे शोधण्याच्या नादातुनंच ! बखरकारांपासून ते आजकालच्या स्वयंघोषित इतिहासकारांपर्यंत आजवर 'संभाजी' या ऐतिहासिक पात्रावर पुष्कळ लोकांनी लिहिले आहे.ज्याने-त्याने आपापल्या कुवतीनुसार,अपेक्षांनुसार स्वतःला हवे तसे संभाजीराजे रंगवले. यातून संभाजीराजांची तीन प्रकारची व्यक्तीमत्वे प्रामुख्याने रंगवलेली दिसतील.एक, जुन्या बखरकारांनी रंगवलेले हट्टी,दुराग्रही,कोपिष्ट,व्यसनी,बदफैली,नाकर्ते संभाजीराजे;अखेरच्या क्षणी फिल्मी स्टाईलने त्यांना आपली चुक उमगली आणि देशधर्मासाठी अजोड असे बलिदान त्यांनी दिले.गेल्या कित्येक वर्ष...

Chhatrapati Shivaji and his Maharashtra-dharma (The religious policy of Chhatrapati Shivaji Maharaj)

It is a rule of Historiography, that to draw any inference about a historical figure, one must consider at least three different types of contemporary facts – first, words and deeds of that person himself or his close associates; second, views of his enemies and third, convictions of any third person or neutral authority! Now a days the religious policy of Chhatrapati Shivaji Maharaj is often debated, sometimes for political or other interests by different people, parties and institutions. However, by studying ample of available evidences in aforementioned fashion, a conclusion can easily be made. The very first thing that we should bear in our mind is that we are discussing an era of strong religious beliefs. Customs and living of people were greatly influenced by sayings of religious scriptures. For almost three hundred years before Chhatrapati Shivaji, India was ruled by Muslim invaders, majority of them proved to be fanatics. For every new territory conquered, Hindus we...