आपल्या पराक्रमाने सर्व दिशा उजळून टाकणाऱ्या स्फुरोत्प्रतापोज्ज्वलदिग्विभागः शंभूराजांना आदरपुर्वक मुजरा..... राजा शंभूछत्रपती महाराष्ट्र म्हणजे दगडांचा देश!! राकट देश,कणखर देश..या दगडांच्या देशात जगन्मातेने दोन उत्तुंग लेणी कोरली.पहिलं लेणं म्हणजे विधात्याने सह्याद्रीच्या कळसावर चढवलेला राजमुकूटच-राजा शिवछत्रपती!!आणि दुसरं लेणं म्हणजे या राजमुकूटावर शोभून दिसणारा हि-यांचा शिरपेचंच जणू,हिऱ्यांइतकाच तेजस्वी आणि कणखर - राजा शंभूछत्रपती!! स्वराज्य- स्वभिमानाने चेतवलेलं पवित्र अग्निकुंड!! जिजाऊ आणि शहाजीराजांनी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांत हे अग्निकुंड मांडलं.. शिवरायांनी पाहता पाहता हा वन्ही चेतवला,महाराष्ट्रधर्म जागवला;महाराष्ट्राच्या कणाकणांतून स्वाभिमानी उर्जेचा कल्लोळ जागवला.या पवित्र यज्ञाची धुरा शंभूराजांनी सांभाळली;प्रसंगी त्यात स्वतःची आहुती दिली;पण हे अग्निकुंड तसंच धगधगतं ठेवलं. संभाजी,सहस्त्रसुर्यांच्या दाहकतेलाही नमवतील,अशी ही तीन तेजस्वी ओजस्वी अक्षरं!संभाजी म्हणजे धगधगता स्वाभिमान,संभाजी म्हणजे शौर्य,संभाजी म्हणजे धैर्य,संभाजी...
।। महाराष्ट्रधर्मसेवातत्परः पाध्ये कुलोत्पन्नः अपर्णासुतः सागरः निरन्तरः ।।