पेशव्यांचा थाट
'पेशवाई थाट' हा आपल्याकडे अगदी सहज वापरला जाणारा वाक्प्रयोग ! मध्यंतरी 'पेशवाई थाट' म्हणून पेशवाईतील जेवणावळींचे वर्णन करणारी एक पोस्ट सोशल मिडीयावर फिरत होती. त्या लेखाची सत्यासत्यता ठाऊक नसली, तरी मराठ्यांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात लग्नावळीचे जेवण कसे होते, याची माहिती देणारा एक कागद प्रसिद्ध आहे.
सदर यादी 'काव्येतिहास-संग्रहात प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक पत्रे, यादी वगैरे लेख' (संपादक गो.स. सरदेसाई, या. मा. काळे, वि. स. वाकसकर) ले. ३९७ अशी प्रसिद्ध झाली आहे. १० फेब्रुवारी १७८३ च्या नाना फडणवीस यांनी बनवून दिलेल्या नेमणूक यादीत सुमारे बावीस बंद आहेत. सवाई माधवराव पेशव्यांच्या लग्नातील जबाबदाऱ्या व नेमणूका नाना फडणवीस यांनी करून दिल्या आहेत.
यादीतील काही उल्लेख दिले, म्हणजे 'पेशव्यांचा थाट' आणि नाना फडणवीसांची काटेकोर व्यवस्था आणि शिस्त याचे काही मासलेवाईक नमुने नजरेस येतील. उदा.
१. जेवण झाल्यावर हात धुवायला कोमट पाणी, हातावर साखर व दात कोरावयास लवंग देत जावे.
२. गंध-अक्षत लावताना - वाकडे गंध लागू नयें व अक्षता लावताना नाकाला धक्का न लागता कपाळचा मध्य पाहून लहान मोठी अक्षत ओघळ न येता वाटोळी लावावी व गंध उभे-आडवे ज्यास पाहिजे तसे लावावे.
'गंध अक्षत लावणार याणी नखे काढून बोटे चांगली करून लावावे'
३. गंध राहिल ते जपोन दूसरे दिवसास राखीत जावे.
४. विडे ज्यास जसे देणे तसे यथायोग्य पाहून देत जाणे. वावगा खर्च करू नये.
५. भोजनासाठी बनवायची पक्वान्ने व जिन्नस याची तर एक व्यवस्थित यादीच दिली आहे. अगदी विडा बनवण्यासाठीचे साहित्य व पुर्ण पद्धत यात दिलेली आहे. (खालील इमेज पहा).
६. चांगल्या कोशिंबिरी वीस प्रकारच्या व तिखट चटण्या चांगल्या बारीक वाटून रुचिकर कराव्यात. निंबू चिरून पंचामृत, रायती व भरते दोन आदिकरून पंचवीस तीस प्रकार करावे. एक दुसरी चमत्कारीक कोशिंबीर करावी.
'विचारून वाढावी.' !!
डॉ. सागर पाध्ये.
#इतिहासाच्या_पाऊलखुणा

अप्रतिम माहिती
ReplyDelete