लुबाडली गेलेली पाटीलकी महार व्यक्तीला परत दिल्याबाबतचे पत्र.
मध्ययुगीन महाराष्ट्रात गावाच्या कारभारात, विशेषतः कर गोळा करणे व राखणदारी करणे यामध्ये पाटील, कारभारी, चौगुला आणि महार असा चार प्रकारच्या व्यक्तींचा सहभाग असे.
यापैकी कर गोळा करण्याचे काम पाटील करत असे. करांचा हिशोब ठेवण्याचे आणि इतर लिखापढीचे काम कुलकर्णी करत असे. चौगुला कर गोळा करण्याच्या कामात पाटलाला मदत करत असे आणि महार हा गावचा शिपाई आणि गावच्या सीमांचा राखणदार म्हणून काम करत असे. गावच्या बाबतीत जी कामे पाटील आणि कुलकर्णी करत असत, तिच कामे परगण्याच्या बाबतीत अनुक्रमे देशमुख आणि देशपांडे करत असत. हे सर्व अधिकार वंशपरंपरागत चालत असत.
हे अधिकार साधारणतः जातीनिहाय असत. कुलकर्णीपण ब्राह्मण किंवा प्रभू यांच्याकडे असे. महारांचे वतन शक्यतो महार जातीच्या व्यक्तीकडेच असत. मात्र चौगुला मराठा किंवा इतर जातीचाही असू शके. पाटील हा सामान्यतः मराठा जातीचा मात्र अनेकदा ब्राह्मण, धनगर, माळी, महार किंवा मुसलमान व्यक्तीलाही पाटीलकी दिल्याचे आढळते.
[संदर्भ - श्री राजा शिवछत्रपती भाग १, ग. भा. मेहेंदळे - महाराष्ट्रातील गावांचा कारभार - पृ. क्र. ३१०]
सदर पत्रप्रकार हा महजर म्हणून ओळखला जातो. अनेक व्यक्तींच्या उपस्थितीत,त्यांना साक्ष ठेवून हा कागद केला जात असे. यात उपस्थित राहण्यासाठी व्यक्तींवर जाती-धर्माचे बंधन नसे. मातब्बर व्यक्तीचे नाव सर्वात आधी स्वतंत्र लिहिले जाई. देशमुख वा पाटलांच्या नावाखाली 'नांगरा'ची निशाणी केलेली असे. इतर गावकामगारांच्या नावाखाली किंवा नावापुढे ज्याच्या त्याच्या व्यवसायाची खूण (निशाणी) म्हणून छोटे चिन्ह काढत.
[ लेखनप्रशस्ती - डॉ. अनुराधा कुलकर्णी, पृ. क्र. १]
या पत्रात एका महार व्यक्तीच्या पाटीलकीचा निवाडा झाला आहे. गुरव धांडेघरकर व गुरव गोडोलीकर यांनी ते पाटीलकीचे वतन लुबाडले. मोकदमाच्या साक्षीवरून पाटीलकीचे वतन 'शेटी बिन नागनाक महार' याचे असल्याचे सिद्ध होताच त्याच्या नावाने पुन्हा करून दिले.
[संदर्भ - सनदापत्रांतील माहिती , संपादक - गणेश चिमणाजी वाड; प्रकरण - ५,ले. ३४, पृ. क्र. १३४]
शब्दार्थ -
वतन/मिरास- वंशपरंपरागत अधिकार
लाजिम - कर, हक्क
पासोडी - पाटलाला सारा माफ केलेली जमिन
डॉ. सागर पाध्ये

Comments
Post a Comment