Skip to main content

Posts

Showing posts from October, 2021

महाभारतातील युद्धकथा - भीष्मवधपर्व

( पुढील कथा हे व्यासकृत संहितेचे शब्दशः भाषांतर नाही, तर संक्षिप्त मराठी रुपांतर आहे. मात्र कोणत्याही प्रकारचा कल्पनाविलास पुर्णतः टाळलेला आहे. सर्व उपमा, विशेषणंही शक्यतो संहितेनुसारंच वापरलेली आहेत. सदर प्रकरणातील भांडारकर, निलकंठी आणि दाक्षिणात्य प्रतींतील श्लोकसंख्येत फारसा फरक नाही. जिथे महत्वाचा फरक असेल, तिथे पुढील भागांत दर्शवित जाईन.) नववा दिवस उजाडला, काल रात्रीचा दुर्योधनाचा विलाप भीष्मांना फार अस्वस्थ करत होता. दुर्योधनाच्या वाग्बाणांनी विद्ध झालेले पितामह, दुर्योधनाला आता मी नकोसा झालो आहे, हे जाणून होते. 'पांडवप्रेमापुढे हतबल झालेल्या भीष्मांनी शस्त्र खाली ठेवावे, मग मी एकटाच अर्जुनासकट समस्त पांडवसेनेचा संहार करतो', असं म्हणे तो कर्ण शपथेवर सांगत होता. जेव्हा दुर्योधन गंधर्वांच्या तावडीत सापडला होता, त्यावेळेस दुर्योधनास सोडून पळून जाणारा तो घमेंडी कर्ण ! त्याचंच ऐकून काल रात्री दुर्योधन अद्वातद्वा बोलला. भीष्मांना हा पक्षपाताच्या आरोपाचा कलंक धुवून काढायचा होता. मनोमन आपल्या पराधीनतेची निंदा करत, आज अर्जुनाशी युद्ध करण्याचा भीष्मांनी निश्चय केला. भीष्मांचा हा दृ