Skip to main content

Posts

Showing posts from June, 2019

... राजा कालस्य कारणम् ।। (पत्रांतील शिवकालीन कथा)

ही गोष्ट आहे शिवकाळातील कोंढवे गावच्या एका तरुणाची, त्याचं नाव 'येसाजी पाटील कामथे'. त्याचे पुर्वज एका मुसलमानाच्या वतीने गावच्या मोकदमीचा कारभार पहात असत. पुर्वी हिशेबात काही गडबड झाल्याच्या कारणाने येसाजीच्या मोठ्या भावाला सिंहगडावर नेऊन त्याचे डोके मारले होते. मात्र एक दिवस अवचित येसाजीला शिवछत्रपतींसाठी एक काम करायची संधी मिळाली आणि त्या संधीचे येसाजीने सोने केले... शिवचरित्र साहित्य खंड दोन, लेखांक १०५ मधील एका पत्रात ही गोष्ट आली आहे. पुर्वी दौलतशाह नावाच्या कोणा मुसलमान व्यक्तीकडे असलेले इनाम, त्याला मुलगा नसल्याने त्याची मुलगी रतनमा हिच्याकडे आले होते. त्याचा कारभार मात्र बाळोजी, हरजी व जाव पाटील पाहत असत. पुढे दादाजी कोंडदेवाच्या काळात सिंहगडावर नेऊन कुलकर्णीपण पाहणारा बावाजी पाटील व इतर कारभाऱ्यांची डोकी मारली गेली. त्या बावाजी पाटलाचा धाकटा भाऊ येसाजी पाटील ! एक दिवस शिवछत्रपती शिवापुरास आले आणि महाराजांनी शिवापुरात बाग आमराइसाठी धरण बांधण्याचा हुकुम सोडला. राजाचं काम म्हणून लोक लगबगीने कामास लागले; पण या कामात एक निराळाच अडथळा निर्माण झाला. वाटेतंच एक भला मोठा

संस्कार... संस्कृती... महाराष्ट्रधर्म

इतिहासाचा अभ्यास का करायचा ? या नेहमीच्या प्रश्नाला माझं एकंच उत्तर कायम असतं, 'राष्ट्रपुरुषांकडून 'राष्ट्रीय चारित्र्य' शिकण्यासाठी !' आपल्या पुर्वजांचे कर्तृत्व, संस्कार यांची जाण असली, म्हणजे नकळत आपलीही पाऊले त्या मार्गावर पडत राहतात. मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ मधील छत्रपती शिवाजी महाराजांचे एक पत्र प्रसिद्ध आहे.आपल्या छावणीच्या अधिकाऱ्यांस लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणतात, "सिपाही हो अगर पावखलक हो, बहुत यादी धरून वर्तणूक करणे. कोण्ही रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाही. " (ले. २८) आता थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीतील असेच एक पत्र पहा; सदर पत्र पेशवे दप्तर खंड १५, लेखांक ४६ असे प्रसिद्ध झाले आहे. अंताजी माणकेश्वर या पेशव्यांच्या सरदाराने चिमाजी आप्पांना लिहिलेले हे पत्र आहे. या पत्रात एका ठिकाणी अंताजी म्हणतात, "वरचेवर श्रीमंतांची पत्रे येविसी येतात की काडीचा उपद्रव रयेतीस न देणे." कोणत्याही प्रकारे रयतेस तोशीस पोहचू नये, याची काळजी मराठ्यांचे राज्यकर्ते घेत होते. हाच शिवछत्रपतींनी शिकवलेला 'महाराष्ट्रधर्म' होता