Skip to main content

Posts

Showing posts from 2019

मध्ययुगीन जातीव्यवस्था - एक दृष्टिक्षेप

गतकालीन इतिहासाचे अवलोकन करीत असताना, काळाच्या मर्यादा जाणणे फार आवश्यक असते. वास्तविक इतिहासातील कोणत्याही घटनेचे जसेच्या तसे संपूर्ण आकलन करून घेणे अशक्य आहे. आपण केवळ उपलब्ध संदर्भ-पुराव्यांच्या आधारे जास्तीत जास्त सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू शकतो. कर्मकांड, अंधश्रद्धा, पोथीनिष्ठ धार्मिक समजूती यांचे मध्ययुगात वर्चस्व होते, हे खरेच ! केंद्रीय राजसत्ता पेशव्यांच्या मुठीत आल्यावर राजकीय व्यवस्थेत ब्राह्मणांचे वर्चस्व वाढले. माधवराव पेशव्यांच्या मृत्यूपश्चात या व्यवस्थेत जी अनागोंदी माजली तिची वर्णने क्लेशदायकंच आहेत. समाज म्हटला, म्हणजे असे दोष प्रत्येक समाजात, प्रत्येक काळात आढळतील; पण कुठल्याही बाबतीत असे थेट काळे-पांढरे पट्टे ओढता येत नाहीत; हेच दाखवण्यासाठी हा प्रयत्न. मध्ययुगात वर्णभेद व त्या त्या वर्णांची कर्तव्ये याविषयीची समजुत दृढ होती. या कर्तव्यांचे पालन म्हणजेच धर्मपालन असे समजले जात असे. याबद्दल एक उदाहरण देतो. छत्रपती संभाजी महाराज आपल्या 'बुधभुषणम्'या ग्रंथात शिवछत्रपतींचा गौरव करताना म्हणतात - येन क्षोणितले कलावविकले बुद्धावतारं गते गोपलेखिलवर्णधर्...

महाराष्ट्रधर्माच्या अस्मितेची मूर्ती - श्रीगणेश

गणानां त्वा गणपति हवामहे प्रियाणां त्वा प्रियपति हवामहे निधीनां त्वा निधिपति हवामहे वसो मम । आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम ।। यजुर्वेदाच्या तेविसाव्या अध्यायात राष्ट्र आणि प्रजा या संकल्पनांचे विवरण आले आहे. त्यापैकी एकोणिसाव्या श्लोकात 'हे गणांच्या नायका गणपती, सर्व प्रिय पदार्थांचा प्रियपति, अर्थादी ऐश्वर्याचा निधिपती मी तुझा स्विकार करतो. मी (प्रकृती) तुला प्राप्त होते आणि समस्त प्रजेला धारण करणाऱ्या मला (प्रकृती) तू प्राप्त होवो', अशी परमेश्वराची प्रार्थना केली आहे ! वास्तविक उपरोक्त मंत्रात 'गणपती' या देवतेचा स्त्रीगणांचा अधिपती, पालक अशा अर्थाने उल्लेख आहे; किंवा प्रियपती, निधीपती हे उल्लेख 'वसू'चेही मानले जातात. या मंत्रासहीत इतर एकोणीस मंत्र ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलात आहेत. वास्तविक याही मंत्रांची देवता ही 'बृहस्पती'असून, वर्तमानकाळात ज्या स्वरूपात गणपतीची पूजा केली जाते, तो गणपती वेदात अभिप्रेत होता का, यावर अभ्यासक शंका घेतात. वेदांचा काळ अभ्यासकांच्या मते इसवी सन पुर्व १५००वर्षे इतका पाठी नेला जाऊ शकतो. आजच्या काळाशी मिळत्याजुळत्या गण...

... राजा कालस्य कारणम् ।। (पत्रांतील शिवकालीन कथा)

ही गोष्ट आहे शिवकाळातील कोंढवे गावच्या एका तरुणाची, त्याचं नाव 'येसाजी पाटील कामथे'. त्याचे पुर्वज एका मुसलमानाच्या वतीने गावच्या मोकदमीचा कारभार पहात असत. पुर्वी हिशेबात काही गडबड झाल्याच्या कारणाने येसाजीच्या मोठ्या भावाला सिंहगडावर नेऊन त्याचे डोके मारले होते. मात्र एक दिवस अवचित येसाजीला शिवछत्रपतींसाठी एक काम करायची संधी मिळाली आणि त्या संधीचे येसाजीने सोने केले... शिवचरित्र साहित्य खंड दोन, लेखांक १०५ मधील एका पत्रात ही गोष्ट आली आहे. पुर्वी दौलतशाह नावाच्या कोणा मुसलमान व्यक्तीकडे असलेले इनाम, त्याला मुलगा नसल्याने त्याची मुलगी रतनमा हिच्याकडे आले होते. त्याचा कारभार मात्र बाळोजी, हरजी व जाव पाटील पाहत असत. पुढे दादाजी कोंडदेवाच्या काळात सिंहगडावर नेऊन कुलकर्णीपण पाहणारा बावाजी पाटील व इतर कारभाऱ्यांची डोकी मारली गेली. त्या बावाजी पाटलाचा धाकटा भाऊ येसाजी पाटील ! एक दिवस शिवछत्रपती शिवापुरास आले आणि महाराजांनी शिवापुरात बाग आमराइसाठी धरण बांधण्याचा हुकुम सोडला. राजाचं काम म्हणून लोक लगबगीने कामास लागले; पण या कामात एक निराळाच अडथळा निर्माण झाला. वाटेतंच एक भला मोठा...

संस्कार... संस्कृती... महाराष्ट्रधर्म

इतिहासाचा अभ्यास का करायचा ? या नेहमीच्या प्रश्नाला माझं एकंच उत्तर कायम असतं, 'राष्ट्रपुरुषांकडून 'राष्ट्रीय चारित्र्य' शिकण्यासाठी !' आपल्या पुर्वजांचे कर्तृत्व, संस्कार यांची जाण असली, म्हणजे नकळत आपलीही पाऊले त्या मार्गावर पडत राहतात. मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ मधील छत्रपती शिवाजी महाराजांचे एक पत्र प्रसिद्ध आहे.आपल्या छावणीच्या अधिकाऱ्यांस लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणतात, "सिपाही हो अगर पावखलक हो, बहुत यादी धरून वर्तणूक करणे. कोण्ही रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाही. " (ले. २८) आता थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीतील असेच एक पत्र पहा; सदर पत्र पेशवे दप्तर खंड १५, लेखांक ४६ असे प्रसिद्ध झाले आहे. अंताजी माणकेश्वर या पेशव्यांच्या सरदाराने चिमाजी आप्पांना लिहिलेले हे पत्र आहे. या पत्रात एका ठिकाणी अंताजी म्हणतात, "वरचेवर श्रीमंतांची पत्रे येविसी येतात की काडीचा उपद्रव रयेतीस न देणे." कोणत्याही प्रकारे रयतेस तोशीस पोहचू नये, याची काळजी मराठ्यांचे राज्यकर्ते घेत होते. हाच शिवछत्रपतींनी शिकवलेला 'महाराष्ट्रधर्म' होता...

स्वराज्याचा श्रीगणेशा

स्वराज्य…महाराष्ट्रधर्मोदयासमयी जिजाऊसाहेब व शाहजीराजांस पडलेले गोमटे स्वप्न ! स्वराज्य…ज्याला मुर्त स्वरुप दिले क्षत्रियकुलावतंस शिवछत्रपतींनी ! माता-पित्यांच्या प्रेरणेने स्वराज्याची एक-एक विट रचण्यास सुरुवात करणारा एक किशोरवयीन मुलगा ते दिडशे-पावणेदोशे वर्षे स्थिर झालेल्या आदिलशाही सत्तेविरोधात प्रचंड आत्मविश्वासाने शड्डू ठोकून त्यांना समर्थपणे चीत करणारा तरुण, हा शिवछत्रपतींचा प्रवास चित्तथारक आणि प्रेरणादायी आहे. इ. स. १६४२ मध्ये दादाजी कोंडदेवांसोबत शिवाजीमहाराज आणि जिजाऊसाहेब यांना शाहजीराजांनी बंगळूराहून पुण्याकडे पाठवून दिले. तिथून शिवाजीराजे, जिजाऊसाहेब आणि दादाजी कोंडदेव ही त्रयी पुण्याकडील जाहगीरीचा कारभार पाहत होती. याकाळात आपल्या अखत्यारीतला प्रदेश किल्ल्यांच्या साथीने महाराज अधिकाअधिक बळकट करत गेले. बारा मावळांतील देशमुख देशपांड्यांस ते राजी झाल्यास सोबत घेऊन, वाटेत आडवे आल्यास त्यांस दस्त करुन संचणी करत चालले. दरम्यान आपले राज्य लोकांच्या कल्याणासाठी आहे, हे बारा मावळातील लोकांत राजांनी पक्के ठसवले. ही वाटचाल सुरु असतानांच इ. स. १६४८ च्या उत्तरार्धात अठरा वर्षे वयाच...

मल्हारराव होळकर आणि नजीबउद्दौलाह

उत्तरेत वारंवार अहमदशाह अब्दालीच्या आडून मराठ्यांस शह देणाऱ्या, अब्दालीच्या धार्मिक भावनेस हात घालून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्या नजीबास मराठ्यांनीच एका कागदात 'खेळ्या' असे म्हटले आहे. पानिपतावरील रणसंग्रामास जबाबदार शकूनी खरा नजीबंच ! रघुनाथराव पेशवे आणि मल्हारराव होळकर यांच्या इ. स. १७५७ च्या उत्तरस्वारीतंच ही विषवल्ली खरंतर ठेचली जाणार होती; पण नजीबाने कसे डावपेच रचले पहा. १. १७५७ मध्ये नजीबाने मल्हारराव होळकरांस मोठी रक्कम दिली असा उल्लेख आहे  (झर-ए-खातिर-बतारिक-ए-रिश्वत).  मल्हाररावांनी त्याबदल्यात रघुनाथराव व इमाद-उल-मुल्क याजकडे नजीबासाठी रदबदली करावी असा नजीबाचा उद्देश होता.  संदर्भ - Marathas and Panipat - Hari Ram Gupta, page no. 110 (लेखकाने तारीख-ए-मुज्जफिरी, ले. १२६ हा मुळ संदर्भ जोडला आहे) २.  नजीबाने मल्हारराव होळकरांमार्फत राघोबाशी तह करण्याविषयीची कलमे कळवली. संदर्भ - मराठी रियासत खंड ४, गो. स. सरदेसाई; पृ. क्र. ५२४. प्राथमिक संदर्भ - पेशवे दप्तर, खंड २, ले. ७७ ३.  तारीख -ए-नजीबुद्दौल्लाह या नावाने इ. स. १७७३ मध्ये सय्यद नुरुद्दीन ह...

इ. स. १७०२ साली महार व्यक्तीस दिलेला पाटीलकीचा महजर

लुबाडली गेलेली पाटीलकी महार व्यक्तीला परत दिल्याबाबतचे पत्र. मध्ययुगीन महाराष्ट्रात गावाच्या कारभारात, विशेषतः कर गोळा करणे व राखणदारी करणे यामध्ये पाटील, कारभारी, चौगुला आणि महार असा चार प्रकारच्या व्यक्तींचा सहभाग असे. यापैकी कर गोळा करण्याचे काम पाटील करत असे. करांचा हिशोब ठेवण्याचे आणि इतर लिखापढीचे काम कुलकर्णी करत असे. चौगुला कर गोळा करण्याच्या कामात पाटलाला मदत करत असे आणि महार हा गावचा शिपाई आणि गावच्या सीमांचा राखणदार म्हणून काम करत असे. गावच्या बाबतीत जी कामे पाटील आणि कुलकर्णी करत असत, तिच कामे परगण्याच्या बाबतीत अनुक्रमे देशमुख आणि देशपांडे करत असत. हे सर्व अधिकार वंशपरंपरागत चालत असत. हे अधिकार साधारणतः जातीनिहाय असत. कुलकर्णीपण ब्राह्मण किंवा प्रभू यांच्याकडे असे. महारांचे वतन शक्यतो महार जातीच्या व्यक्तीकडेच असत. मात्र चौगुला मराठा किंवा इतर जातीचाही असू शके. पाटील हा सामान्यतः मराठा जातीचा मात्र अनेकदा ब्राह्मण, धनगर, माळी, महार किंवा मुसलमान व्यक्तीलाही पाटीलकी दिल्याचे आढळते. [संदर्भ - श्री राजा शिवछत्रपती भाग १, ग. भा. मेहेंदळे - महाराष्ट्रातील गावांचा कारभार...

पत्ररूप शंभूदर्शन

छत्रपती संभाजी महाराजांची कारकिर्द अवघी नऊ वर्षांची.. तीसुद्धा सतत युद्धमान; याकाळातले 'शंभूछत्रपती' खरोखरच जाणून घ्यायचे, तर त्यांची उपलब्ध पत्रे वाचण्याखेरीज पर्याय नाही. पुढील दोन पत्रे पाहिली; म्हणजे शंभूराजे युद्धाच्या काळातही प्रजाहित व धर्माबाबत कसे सदैव तत्पर होते. हे लक्षात येते. १. बापोली आणि सिडकोली या गावांना सिद्दी आणि पोर्तुगीजांनी उपद्रव दिला. रयत परगंदा होत आहे. तेव्हा त्याची चौकशी करावी. तसेच दादाजी कुलकर्णी यांचा शेतीचा भाग कारळे येथे होता. तो प्रजाभाग म्हणून खर्च केला म्हणून त्याने तक्रार केली. तेव्हा राजभाग वजा करुन उरलेला भाग त्यास परत द्यावा अशा राजाज्ञेचे पत्र आहे. श.१६०५ माघ वद्य १४ इ. स. १६८४ फेब्रु. ५                                 श्री   स्वस्ति श्री राज्याभिषेक शके १० रुधिरोद्रारी नाम संवत्सरे माघ बहुल चतुर्दसी भोमवासरे राजश्री चिमणाजी आऊजी यांसि राजाज्ञा ऐसीजे कुदे बापोली हे दोन्हीं गाव व तिसरे मौजे सिडकोली मा। चेऊल तीन्ही गाव गनीम हबसी व फिरंगी यानी मारुन नेलें त...

पेशव्यांचा थाट

पेशव्यांचा थाट 'पेशवाई थाट' हा आपल्याकडे अगदी सहज वापरला जाणारा वाक्प्रयोग ! मध्यंतरी 'पेशवाई थाट' म्हणून पेशवाईतील जेवणावळींचे वर्णन करणारी एक पोस्ट सोशल मिडीयावर फिरत होती. त्या लेखाची सत्यासत्यता ठाऊक नसली, तरी मराठ्यांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात लग्नावळीचे जेवण कसे होते, याची माहिती देणारा एक कागद प्रसिद्ध आहे. सदर यादी 'काव्येतिहास-संग्रहात प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक पत्रे, यादी वगैरे लेख' (संपादक गो.स. सरदेसाई, या. मा. काळे, वि. स. वाकसकर) ले. ३९७ अशी प्रसिद्ध झाली आहे. १० फेब्रुवारी १७८३ च्या नाना फडणवीस यांनी बनवून दिलेल्या नेमणूक यादीत सुमारे बावीस बंद आहेत. सवाई माधवराव पेशव्यांच्या लग्नातील जबाबदाऱ्या व नेमणूका नाना फडणवीस यांनी करून दिल्या आहेत. यादीतील काही उल्लेख दिले, म्हणजे 'पेशव्यांचा थाट' आणि नाना फडणवीसांची काटेकोर व्यवस्था आणि शिस्त याचे काही मासलेवाईक नमुने नजरेस येतील. उदा. १. जेवण झाल्यावर हात धुवायला कोमट पाणी, हातावर साखर व दात कोरावयास लवंग देत जावे. २. गंध-अक्षत लावताना - वाकडे गंध लागू नयें व अक्षता लावताना नाकाला धक...

संभाजीराजे दिलेरखानाच्या गोटात : वास्तव आणि अवास्तव

छत्रपती संभाजी महाराज हा नेहमीच जिव्हाळ्याचा आणि विवाद्य विषय राहिला आहे.आजही या स्वराज्याच्या द्वितीय छत्रपतीभोवती असणारे हे वादाचे वलय अतिशय दुर्दैवीच म्हणावे लागेल. संभाजीराजांविषयी काही महिन्यांपुर्वीच  साहित्यातले संभाजी : समज आणि गैरसमज ' हा लेख लिहिला होता.तो याच ब्लॉगवर वाचता येईल. आज संभाजीराजे व दिलेरखान प्रकरणाबाबत काही ठराविक मुद्दे- संभाजीराजांचा दैदिप्यमान पराक्रम,त्यांचं शौर्य आणि स्वराज्यासाठी दिलेलं अजोड बलिदान सर्वज्ञात आहे.बखरी आणि ललित वाङ्मयानी चिकटवलेल्या काजळीतून आज पुर्णपणे बाहेर येऊन ते आज झळाळत आहे.अशावेळी हा शिवपुत्र खरंच शत्रुला जाऊन मिळाला असेल का ,असा प्रश्न पडतो. याबद्दल समकालीन साधनं काय म्हणतात त्याचा हा शोध – १. शिवाजी महाराजांचे विश्वसनीय व कर्तबगार सरदार कान्होजी जेधे यांच् घराण्यातील जेधे शकावलीतील उल्लेख असा - पौश सुध १० संभाजी राजे पारखे होऊन परली गडावरून पळोन मोगलाईत दिलेरखानापासी गेले. (संदर्भ - ऐतिहासिक शकावल्या - संपादक अविनाश सोवनी, पृ. क्र. २६ )  फारसी साधनं आणि सर्व बखरी संभाजीराजे थोरल्या छत्रपतींवर रागावून दिलेर...

शिवछत्रपतींचा महाराष्ट्रधर्म !

एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीबाबत निष्कर्ष काढायचे म्हटले म्हणजे साधारणतः तीन प्रकारच्या व्यक्तींचे मत विचारात घ्यावे लागते. एक, ती व्यक्ती स्वतः किंवा त्या व्यक्तीच्या पक्षातील इतर व्यक्तींनी व्यक्त केलेले मत; दुसरे, व्यक्तीच्या शत्रूंनी व्यक्त केलेले मत आणि तिसरे, समकालीन त्रयस्थ व्यक्तीने व्यक्त केलेले मत ! आज आपण शिवछत्रपतींच्या धार्मिक धोरणाबाबत अशा तीन प्रकारच्या व्यक्तींचे मत पाहू - सगळ्यात आधी महाराजांचा शत्रू महाराजांबाबत काय म्हणतो पाहू. खाफीखान हा औरंगजेबाच्या दरबारातील लेखक त्याच्या 'मुन्तूखुबू-ल-लुबाब-ए-महंमदशाही' या ग्रंथात म्हणतो, "“Shivaji had always striven to maintain the honour of the people in his territories. He persevered in a cause of rebellion, in plundering carvans and troubling mankind; but he entirely abstained from other disgraceful acts, and was careful to maintain the honour of the women and children of Muslims when they fell into his hands. His injunctions upon this point were very strict, and anyone who disobeyed them received punishment....