Skip to main content

संभाजीराजे दिलेरखानाच्या गोटात : वास्तव आणि अवास्तव

छत्रपती संभाजी महाराज हा नेहमीच जिव्हाळ्याचा आणि विवाद्य विषय राहिला आहे.आजही या स्वराज्याच्या द्वितीय छत्रपतीभोवती असणारे हे वादाचे वलय अतिशय दुर्दैवीच म्हणावे लागेल.

संभाजीराजांविषयी काही महिन्यांपुर्वीच साहित्यातले संभाजी : समज आणि गैरसमज ' हा लेख लिहिला होता.तो याच ब्लॉगवर वाचता येईल.


आज संभाजीराजे व दिलेरखान प्रकरणाबाबत काही ठराविक मुद्दे-
संभाजीराजांचा दैदिप्यमान पराक्रम,त्यांचं शौर्य आणि स्वराज्यासाठी दिलेलं अजोड बलिदान सर्वज्ञात आहे.बखरी आणि ललित वाङ्मयानी चिकटवलेल्या काजळीतून आज पुर्णपणे बाहेर येऊन ते आज झळाळत आहे.अशावेळी हा शिवपुत्र खरंच शत्रुला जाऊन मिळाला असेल का ,असा प्रश्न पडतो. याबद्दल समकालीन साधनं काय म्हणतात त्याचा हा शोध –

१. शिवाजी महाराजांचे विश्वसनीय व कर्तबगार सरदार कान्होजी जेधे यांच् घराण्यातील जेधे शकावलीतील उल्लेख असा -
पौश सुध १० संभाजी राजे पारखे होऊन परली गडावरून पळोन मोगलाईत दिलेरखानापासी गेले. (संदर्भ - ऐतिहासिक शकावल्या - संपादक अविनाश सोवनी, पृ. क्र. २६ )

 फारसी साधनं आणि सर्व बखरी संभाजीराजे थोरल्या छत्रपतींवर रागावून दिलेरखानाकडे एवढंच सांगतात,त्यातून विशेष बोध होत नाही.

२.'परमानन्दकाव्य’ या संस्कृत ग्रंथात संभाजीराजांची बाजू मांडली आहे;पण यात काही गोष्टी लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे.परमानन्दकाव्य म्हणजे शिवभारत नव्हे.मुळ शिवभारत परमानन्द गोविंद नेवासकर या संस्कृत विद्वानाने लिहिलेले आहे;शिवभारत केवळ १६६१ पर्यंतच (शाहिस्तेखान स्वारीची सुरूवात) लिहिले गेले आहे.त्यापुढे एकतर लिहिले गेले नाही,अथवा पुढील भाग सापडलेला नाही.संभाजीराजांच्या काळातील भाग परमानन्दांचा नातू गोविंद याने लिहिला आहे; हे काही उद्गार-
(शिवाजी महाराज शंभूराजांस- ) मी(शिवाजी महाराज) (कर्नाटक मोहीमेस)जाऊन परत येईपर्यंत तू माझ्या विचाराप्रमाणे राहून शृंगारपुरात मुक्काम कर….  ....निंद्य अशा कलीमुळे रायगडावर नाठाळ अशा अनेकांबरोबर तुझे राहणे योग्य नाही.(अध्याय ७,श्लोक ८५,८६,८७,८८)
यावरून संभाजीराजे,मंत्रीगण यांचे आपसांत पटत नव्हते आणि म्हणूनंच स्वतःच्या अनुपस्थितीत शिवरायांनी संभाजीराजांना तात्पुरते दूर ठेवले हे स्पष्ट होते.
दिलेरखान व संभाजी महाराज यांच्यामधील अस्सल पत्रव्यवहार उपलब्ध नाही.हे संपुर्ण वर्णन परमानन्दकाव्यातील आहे.
पुढे संभाजीराजांना दिलेरखानाच्या गोटात जाण्यापुर्वी देवीचाच दृष्टांत झाला असे परमानन्द म्हणतो.(विभाग ३,अध्याय१०,श्लोक ३७,३८,३९,४०,४१)
(दिलेरच्या गोटात सामील होताना)शंभूराजे म्हणाले,”…. …मी आता दिल्लीश्वरास मिळण्यासाठी जात आहे.पुन्हा या माझ्या सह्याद्रीला तुमची विचारपूस करायला केव्हातरी येईन माझा हा निरोप तुमच्या किल्लेदाराला सांगा किंवा शिवाजी महाराजांना दरबारात सांगा.” (विभाग ३,अध्याय १०,श्लोक ५४,५५,५६,५७)

हे काव्य गोविंदाने शिवछत्रपतींच्या मृत्यूपश्चात आणि छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शाहूंच्याच हयातीतच लिहिले आहे हे वाचकांनी लक्षात घेतले पाहिजे.

३. डिसेंबर १६७९ मध्ये संभाजीराजे दिलेरखानाच्या गोटातून निसटले.जानेवारीत त्यांची शिवाजी महाराजांशी भेट झाली.
जानेवारी १६८० मध्ये शिवाजी महाराजांनी व्यंकोजीराजे यांना पत्र लिहिले होते. (शि.प.सा.सं ले.२२३६,पृ.क्र. ६८२)-
चिरंजीव राजश्री संभाजीराजे मोगलाईंत गेले होते त्या्स आणावयाचा उपाय बहुत प्रकारे केला,त्यासहि कळोंन आले कीं या पातशाहीत अगर विजापूरच अगर भानानगरचे पातशाहीत आपले मनोगतानुरूप चालणार नाहीं.ऐसे जाणोन त्यांनीं आमचे लिहिण्यावरून स्वार होऊन आले.त्यांची आमची भेट जाली.घरोब्याचे रीतीने जैसें समाधान करून ये तैसें केलें…
…. स्वराज्यातील इतरही घटना सविस्तर लिहून, ‘हे सर्व वर्तमान तुम्हांस सविस्तर कळावे म्हणोन लिहिले असे.कळले-असावे’ असा पत्राचा शेवट आहे.

थोडक्यात संभाजीराजे रुसून गेले होते,परत आल्यावर त्यांची समजूत घातली असे स्वतः शिवाजी महाराजच आपल्या सावत्र भावास सांगतात.

४. २४ अॉगस्ट १६८० रोजी बाकरेशास्त्रींना लिहिलेल्या संस्कृत दानपत्रात स्वतः संभाजीराजे लिहितात-
दुर्देवशात वैरभाव पत्कलेल्या प्रधानआदिकरून प्रबल दुष्ट मंत्र्यांच्या सांगण्यावरून ज्येष्ठ पुत्राला राज्य न देण्याचा दुष्ट सल्ला मानला गेल्यामुळे ज्याला नानाविध उपसर्ग झाले आहेत….. पितृभक्तीपासून दूर गेलेले….औरंगजेबाच्या सप्तहजारी सेनापतीने(दिलेरखानाने?) भूपाळगड काबीज करण्यासाठी योजना आखून संभाजी राजांसमोर गुडघे टेकले.त्यावेळी शंकराच्या तिसऱ्या नेत्रातून अग्नी प्रकट व्हावा त्याप्रमाणे ते (संभाजीराजे) क्रोधायमान झाले.
इथे शंभूराजे आपल्यासोबत जो अन्याय झाला,त्याबद्दल आणि दिलेरखानाच्या गोटात आपण कसे वागलो याचे वर्णन करतात.

[ संभाजीराजांनी लिहिलेले संस्कृत दानपत्र, यातील 'मतं मे श्रीशिवराजपुत्रस्य... या दोन ओळी स्वत: संभाजीराजांच्या हस्ताक्षरातील आहेत. संदर्भ - छत्रपती संभाजीमहाराजांची पत्रे - डॉ. सदाशिव शिवदे, दानपत्र क्र. १०४]

या अस्सल संदर्भांचा विचार केला असता,
१.निदान संभाजीराजे परत आल्यावर जर ती राजकीय चाल होती,तर आपल्या सावत्र भावाला सत्य काय ते सांगणे शिवाजी महाराजांना शक्य होते.
२.शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांची बाजू उलगडून सांगणाऱ्या परमानन्दकाव्यात,किंवा स्वतः संभाजीराजांनी लिहिलेल्या पत्रात वस्तुस्थिती सांगणे शक्य होते;परंतू ही दोन्ही साधने संभाजीराजांचे मंत्र्यांशी पटत नव्हते,ते रागावून दिलेरखानाकडे गेले असं स्पष्ट सांगतात.
मात्र मग प्रश्न पडतात ते असे –
१.संभाजी महाराज-दिलेरखान संगनमताविषयी शिवरायांच्या कार्यक्षम गुप्तहेरखात्यास खबर नाही लागली ?
२.संभाजीराजे फितुर होते,तर महाराजांनी त्यांना माफ कसे केले ?
३.स्वराज्यद्रोही असते,तर नंतर संभाजी महाराजांनी इतका पराक्रम गाजवून स्वराज्यासाठी असा अजोड त्याग केला असता का ?
थोडा विचार केला असता,त्यास उत्तर मिळते ते असे,
संभाजीराजांनी लिहिलेले दानपत्र त्यांची मनस्थिती व्यवस्थित उलगडून सांगते.संभाजी महाराजांच्या मनात आपल्याकडे पित्याचे दुर्लक्ष झाल्याची,आपल्यावर अन्याय झाल्याची  भावना स्पष्ट दिसून येते.
पोर्तुगीज गव्हर्नरच्या मागोमाग नदीच्या प्रवाहात शिरणे,अखेरच्या क्षणीही परिणामांची फिकीर न करता वागणे यासर्वच गोष्टी संभाजीराजांच्या बेधडक वृत्तीच्या द्योतक आहेत.
परमानन्दकाव्यातील वर्णने-संवाद यांवरून संभाजी महाराजांसही पराक्रम दाखवण्याची इच्छा होती;पण गृहकलहामुळे तशी संधी त्यांना मिळत नव्हती असे दिसते.
अशावेळी स्वराज्यद्रोह म्हणून नव्हे,तर आपणही आपला पराक्रम सिद्ध करावा या भावनेतून संभाजी महाराज मोगलांकडे गेले,आपली चूक उमगताच परतही आले,असेच वाटते.शिवाजी महाराजांनाही पिता व प्रशासक अशा दोन्ही भुमिका पार पाडायच्या होत्या.त्यांनी संभाजीराजांना म्हणूनंच माफ केले.पुढे संभाजीराजांनी पराक्रम गाजवून आपल्यावरील कलंक पुर्णतः धुवून काढला.

आयुष्यात भावनेच्या भरात एखादी चुक घडलीच,तरी आपल्या कर्तृत्वाने ती धुवून काढता येते,याचं अत्यंत वंदनीय उदाहरण म्हणजे शंभूराजे..शंभूराजे मरणंही जगले..आज आम्हाला सर्वात आधी आठवतो तो केवळ दाही दिशा तेजाळून टाकणारा त्यांचा दिव्य पराक्रम..हेच शंभूराजांच्या कर्तृत्वाचं सार आहे.



Comments

Popular posts from this blog

शिवचरित्र कोणते वाचावे ?

"शिवचरित्र कोणते वाचावे ?", हा माझ्या व्हॉटसअॅप किंवा मेसेंजरवर हा सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे. माझ्याप्रमाणेच माझ्या इतिहासप्रेमी मित्रांनाही हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या प्रश्नाचे एकदा सविस्तर उत्तर द्यावे, म्हणून हा लेख लिहित आहे; येथे शिवचरित्राशी निगडीत संदर्भग्रंथाच्या यादीसोबत काही ठराविक चरित्रांविषयी थोडक्यात माहितीही देत आहे; पण लेख वाचण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात घेणे फार आवश्यक आहे. १. शिवचरित्र हा अथांग महासागर आहे. त्यात अगणित शंख-शिंपले आहेत; मोती आहेत. ज्याला ते जसे गवसले, तसे ते त्याने दाखवले. कोणी स्वार्थापोटी त्याचा हवा तसा बाजार मांडला. एकाला दुसऱ्याची मते पटतीलंच असे नाही. पटले, तर चांगले आहे; नाही पटले, तर खुशाल पुढे जा ! २. इतिहासाशी निगडीत कोणतेही साहित्य वा संदर्भग्रंथ पहा. त्या कृतीच्या कर्त्याने आपल्या विधानास विश्वसनीय पुरावा दिला असेल, तरंच ते सत्य. अन्यथा त्याकडे संशयानेच पहावे लागेल. ३. कोणतेतरी एकंच पुस्तक वाचले आणि शिवचरित्र कळले असे मुळीच होत नाही. त्यामुळे 'सर्वोत्तम शिवचरित्र कोणते ?', असा प्रश्न विचा

शिवचरित्र आणि आपण

 छत्रपती शिवाजी महाराज जयंती !  श्रीशालिवाहननृप शके १५५१,शुक्लनाम संवत्सरे,फाल्गुन वद्य तृतीया,अर्थात ज्युलियन कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३०. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्मदिन....जवळपास पावणेचारशे वर्षांपूर्वी सह्यपर्वतावर एक निश्चयाचा महामेरू अवतरला, हृदयस्थ नारायणाने प्रेरणा केली आणि तो युगपुरूष हातातली भवानी तलवार उपसत उच्चारता झाला, "ये राज्य व्हावें, ही तो श्रींची इच्छा !" महाराष्ट्राच्या कणाकणांत स्वाभिमानाचा वन्ही चेतवला; त्याचे स्फुल्लिंग आजही आमच्या हृदयात धगधगत आहेत. शिवरायांचे नाव घेतल्याखेरीज आमचा दिवसही जात नाही. मग शिवजयंती,तिची तारीख- वार-तिथी तर औपचारिकता ठरते.   शिवजयंती साजरी करायची म्हणजे आज आम्ही महाराजांच्या तसबिरीला, मूर्तीला किंवा पुतळ्याला हार वाहतो. मोठमोठ्याने घोषणा देतो. याहीपुढे जाऊन कोणी उत्साही लोक हातात भगवे घेऊन गावभर फिरत राहतील. डिजे लावून नाचणाऱ्यांच्या विकृतीवर मात्र त्वरीत उपचार होणं गरजेचे आहे.; पण मला प्रश्न असा पडतो, की शिवचरित्राची पोच खरंच आज किती भारतीयांना आहे ?   खरं तर माझा प्रश्नच चुकला ! भारतीय म्हणण्या

विजयुदुर्गावरील पराजय : मराठा राजकारणाची शोकांतिका

रा. रा. त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी आपल्या लिखाणातून मराठेशाहीच्या विविध अंगावर अनेकदा टिका केली आहे. गो. स. सरदेसाईलिखित 'नानासाहेब पेशवे' चरित्राची प्रस्तावना शेजवलकरांनी लिहिली आहे. आपल्या धारदार लेखणीने शेजवलकरांनी पेशव्यांच्या धोरणांवर ताशेरे ओढले आहेत, पण काही शब्दांत मराठेशाहीचे दुर्गुण विषद करताना ते म्हणतात, "...प्रत्येक सरदार मुलुखगिरीवर निघण्याच्या आधीच जिंकावयाच्या मुलुखाची सनद छत्रपतींकडून करून घेई. छत्रपतींच्या दरबारचे प्रधान हे निदान इतका तरी मान ठेवतात, असेच समजत. शाहूच्या आगमनाने या प्रकारांत वाढच झाली. पेशव्यांनी जुन्या शिरजोर सरदारांस मोडण्याचा प्रयत्न केला, पण असे करण्यासाठी त्यांस नवीन स्वतःचे सरदार निर्माण करावे लागले. तात्पर्य काय, एकसुत्रीपणास बाध यावयाचा तो आलाच. नानासाहेबास जयाप्पा शिदेंसारख्या सरदारांस जे चुचकारावे लागे व मल्हाररावाच्या मनस्वीपणापुढे मान वाकविण्याची पाळी येई, ते यामुळेच ! मात्र असे पेशवे न करते तर मराठ्यांचे जे नाव गाजले तेहि गाजले नसतें..." (प्रस्तावना - पृ. क्र. १४) १२ फेब्रुवारी १७५६ रोजी नानासाहेब पेशवे व इंग्रज