Skip to main content

छद्मपुरोगामी आणि मनुवाद (जाती-व्यवस्था कोणी निर्माण केली ?)



काय आहे, कोणाकोणाची फॅशन असते, प्रत्येक गोष्टीचं खापर भुतकाळावर फोडायचं. अमुक झालं नसतं, तर तमुक केलं असतं असे सुस्कारे सोडायला आवडतं काहींना ! कोणाकोणाच्या पोटापाण्याचा धंदा असतो हा. एका जातीविरुद्ध दुसऱ्या जातीला भडकवायचं आणि मग भावनेचं राजकारण करुन दुसऱ्या जातीची सहानुभूती मिळवायची.

जन्मजात स्वत:ला उच्च मानून इतरांना 'नीच' म्हणत त्यांच्यावर अन्याय करण्याचं समर्थन कधीही मी करणार नाही; पण प्रश्न असा, मागासवर्गीयांचा विकास करायचा तर तथाकथित उच्चवर्णीयांना, देशाच्या प्राचीन धर्म-परंपरा आणि संस्कृतीला शिव्या दिल्याच पाहिजेत का ? जरा काही झालं का मनुवाद-मनुवादी म्हणत गळे काढण्याची गरज असते का ? जातीवाद मनुने किंवा ब्राह्मणांनी खरंच निर्माण केला का ? संपुर्ण जातीव्यवस्थेला केवळ एक ग्रंथ आणि एकाच जातीची साडेतीन टक्के लोकसंख्या जबाबदार असू शकते का ?

जातीयवादास 'मनुवाद' संबोधत असाल, तर फक्त एकाच धर्माला, एकाच संस्कृतीला, एकाच जातीला शिव्या देणं आणि दुसरीकडे सोयीस्कर डोळेझाक करणं, हा नवा 'पुरोगामी मनुवाद' नव्हे काय ?

कोणी काहीही म्हणायचं आणि आम्ही 'होय हो..' म्हणत रडायचं, हे करण्यापेक्षा प्रत्यक्ष ग्रंथांचं वाचन का करु नये ?

असो, आता आपण प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात पाहू,
"प्रत्येक देशात एक विधीदाता (घटनाकर्ता) असतो, जो आपात्कालीन स्थितीत पापी समाजाला न्याय आणि सदाचरण यांचा मार्ग दाखवण्यासाठी अवतार म्हणून उदयास येतो. मनु, भारताचा विधीदाता ( law-giver हा शब्द आ. बाबासाहेबांनी वापरलाय बरं, नाहीतर दुसरं कोणी वापरला की काही लोकांना पोटशूळ उठतो.); तर मनु, भारताचा विधीदाता, जर खरंच अस्तित्त्वात होता, तर तो नक्कीच एक धाडसी मनुष्य होता. जर त्याने जातीव्यवस्था निर्माण केली, ही गोष्ट सत्य मानली, तर मनु हा एक साहसी मनुष्य मानला पाहिजे आणि मग ज्या समाजाने त्याचा स्विकार केला तो समाज आज आपण ज्या समाजात राहतो त्यापेक्षा वेगळा असलाच पाहिजे. जातीव्यवस्थेचा कायदा निर्माण केला गेला (जातीचा कायदा दिला) ही गोष्टच अकल्पनीय आहे. असं म्हणणं अतिशयोक्तीपूर्ण होणार नाही, की नुसत्या चार शब्दांच्या बळावर स्वत: मनुही अशा कायद्याचं पालन करु शकणार नाही, जिथे एक वर्ण रसातळाला जाईल आणि दुसरा वर्ण प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचेल. सध्या या मनुपुरस्कृत व्यवस्थेचा अगदी सहजपणे ज्या प्रमाणात प्रचार झालेला दिसतोय; या कायद्यांतर्गत येणारी संपुर्ण लोकसंख्या स्वत:च्या अधिपत्याखाली आणून (असे) अन्यायी कायदे लोकांवर थोपवणारा तो एक कठोर शासक होता, असे मानल्याखेरीज हे शक्य झाले नसते. मी मनुबाबत कठोर भासत असेन. पण मनुचे भुत उतरवण्याइतके माझे बळ नाही. आजंही शरीरापासून मुक्त झालेल्या एखाद्या आत्म्याप्रमाणे मनु   अस्तित्वात आहे आणि मला भिती आहे तो अजून बराच काळ जगणार आहे. एक गोष्ट मला आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे, की *मनुने जातींबद्दलचे कायदे निर्माण केले नाहीत (जातींचे कायदे दिलेले नाहीत), त्याला (एकट्याला) असं करणं शक्यही नव्हतं. जातीव्यवस्था मनुच्या फार आधीपासून होती. मनु त्याचा पुरस्कर्ता होता आणि त्याने त्याबद्दल विचारमंथन केले आहे. पण हिंदु समाजाची वर्तमानकालीन व्यवस्था निर्माण करणं त्याला शक्यही नव्हतं आणि त्याने तसं केलेलंही नाही.* प्रचलित जातीव्यवस्थेला त्याने संहितास्वरुप देण्यात आणि जाती-धर्माचा (वर्णाश्रमधर्म?) उपदेश करण्याइतपतंच त्याच्या कार्याची मर्यादा होती. जातीव्यवस्थेचा प्रसार आणि वृद्धी करणं हे इतकं विशाल आव्हान आहे, की ते कोणत्याही एकाच जातीच्या लोकांच्या शक्ती आणि युक्तीने साध्य केलं जाऊ शकत नाही. ब्राह्मणांनी जातीव्यवस्था निर्माण केली अशा सिद्धांतांच्या दाव्यासही हेच लागू होतं. असा विचार करणं (की ब्राह्मणांनी जाती निर्माण केल्या) हे चुकीचं आहे आणि (यामागचा) हेतू द्वेषपुर्ण आहे हे मला लक्षात आणून द्यायचंय, याव्यतिरिक्त जे मी मनुबद्दल बोललो तेच इथे लागू होतं (त्यापेक्षा अधिक बोलण्याची गरज नाही)."

Dr. Babasaheb Ambedkar writings and speeches vol. 1 (castes in India) page no. 16

(सर्वांनाच वाचता यावं म्हणून मराठी भाषांतर दिलं आहे. तरी मुळ गाभ्यास धक्का लावलेला नाही. ज्यांना शंका आहे ते इथेच दिलेलं मुळ इंग्रजी लिखाण वाचू शकतात.)

डॉ. सागर पाध्ये

Comments

Popular posts from this blog

शिवचरित्र कोणते वाचावे ?

"शिवचरित्र कोणते वाचावे ?", हा माझ्या व्हॉटसअॅप किंवा मेसेंजरवर हा सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे. माझ्याप्रमाणेच माझ्या इतिहासप्रेमी मित्रांनाही हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या प्रश्नाचे एकदा सविस्तर उत्तर द्यावे, म्हणून हा लेख लिहित आहे; येथे शिवचरित्राशी निगडीत संदर्भग्रंथाच्या यादीसोबत काही ठराविक चरित्रांविषयी थोडक्यात माहितीही देत आहे; पण लेख वाचण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात घेणे फार आवश्यक आहे. १. शिवचरित्र हा अथांग महासागर आहे. त्यात अगणित शंख-शिंपले आहेत; मोती आहेत. ज्याला ते जसे गवसले, तसे ते त्याने दाखवले. कोणी स्वार्थापोटी त्याचा हवा तसा बाजार मांडला. एकाला दुसऱ्याची मते पटतीलंच असे नाही. पटले, तर चांगले आहे; नाही पटले, तर खुशाल पुढे जा ! २. इतिहासाशी निगडीत कोणतेही साहित्य वा संदर्भग्रंथ पहा. त्या कृतीच्या कर्त्याने आपल्या विधानास विश्वसनीय पुरावा दिला असेल, तरंच ते सत्य. अन्यथा त्याकडे संशयानेच पहावे लागेल. ३. कोणतेतरी एकंच पुस्तक वाचले आणि शिवचरित्र कळले असे मुळीच होत नाही. त्यामुळे 'सर्वोत्तम शिवचरित्र कोणते ?', असा प्रश्न विचा

शिवचरित्र आणि आपण

 छत्रपती शिवाजी महाराज जयंती !  श्रीशालिवाहननृप शके १५५१,शुक्लनाम संवत्सरे,फाल्गुन वद्य तृतीया,अर्थात ज्युलियन कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३०. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्मदिन....जवळपास पावणेचारशे वर्षांपूर्वी सह्यपर्वतावर एक निश्चयाचा महामेरू अवतरला, हृदयस्थ नारायणाने प्रेरणा केली आणि तो युगपुरूष हातातली भवानी तलवार उपसत उच्चारता झाला, "ये राज्य व्हावें, ही तो श्रींची इच्छा !" महाराष्ट्राच्या कणाकणांत स्वाभिमानाचा वन्ही चेतवला; त्याचे स्फुल्लिंग आजही आमच्या हृदयात धगधगत आहेत. शिवरायांचे नाव घेतल्याखेरीज आमचा दिवसही जात नाही. मग शिवजयंती,तिची तारीख- वार-तिथी तर औपचारिकता ठरते.   शिवजयंती साजरी करायची म्हणजे आज आम्ही महाराजांच्या तसबिरीला, मूर्तीला किंवा पुतळ्याला हार वाहतो. मोठमोठ्याने घोषणा देतो. याहीपुढे जाऊन कोणी उत्साही लोक हातात भगवे घेऊन गावभर फिरत राहतील. डिजे लावून नाचणाऱ्यांच्या विकृतीवर मात्र त्वरीत उपचार होणं गरजेचे आहे.; पण मला प्रश्न असा पडतो, की शिवचरित्राची पोच खरंच आज किती भारतीयांना आहे ?   खरं तर माझा प्रश्नच चुकला ! भारतीय म्हणण्या

विजयुदुर्गावरील पराजय : मराठा राजकारणाची शोकांतिका

रा. रा. त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी आपल्या लिखाणातून मराठेशाहीच्या विविध अंगावर अनेकदा टिका केली आहे. गो. स. सरदेसाईलिखित 'नानासाहेब पेशवे' चरित्राची प्रस्तावना शेजवलकरांनी लिहिली आहे. आपल्या धारदार लेखणीने शेजवलकरांनी पेशव्यांच्या धोरणांवर ताशेरे ओढले आहेत, पण काही शब्दांत मराठेशाहीचे दुर्गुण विषद करताना ते म्हणतात, "...प्रत्येक सरदार मुलुखगिरीवर निघण्याच्या आधीच जिंकावयाच्या मुलुखाची सनद छत्रपतींकडून करून घेई. छत्रपतींच्या दरबारचे प्रधान हे निदान इतका तरी मान ठेवतात, असेच समजत. शाहूच्या आगमनाने या प्रकारांत वाढच झाली. पेशव्यांनी जुन्या शिरजोर सरदारांस मोडण्याचा प्रयत्न केला, पण असे करण्यासाठी त्यांस नवीन स्वतःचे सरदार निर्माण करावे लागले. तात्पर्य काय, एकसुत्रीपणास बाध यावयाचा तो आलाच. नानासाहेबास जयाप्पा शिदेंसारख्या सरदारांस जे चुचकारावे लागे व मल्हाररावाच्या मनस्वीपणापुढे मान वाकविण्याची पाळी येई, ते यामुळेच ! मात्र असे पेशवे न करते तर मराठ्यांचे जे नाव गाजले तेहि गाजले नसतें..." (प्रस्तावना - पृ. क्र. १४) १२ फेब्रुवारी १७५६ रोजी नानासाहेब पेशवे व इंग्रज